6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा; अटक होणार नाही मात्र शिक्षा कायम

Manikrao Kokate : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. मात्र या प्रकरणात त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही तर आमदारकीबाबत निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माणिकराव कोकाटे यांना या प्रकरणात अटक होणार नाही. नाशिक न्यायालयाने या प्रकरणात शिक्षक कायम ठेवल्याने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला होता मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्याने माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला होता आणि अजित पवार यांनी देखील राजीनामा स्वीकारला होता.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या