6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Mardaani 3 : मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर अहमदाबादमध्ये राणी मुखर्जी, ‘मर्दानी 3’ च्या प्रमोशनमध्ये वाढवली रंगत

Mardaani 3 : राणी मुखर्जी मर्दानी 3 मध्ये पुन्हा एकदा त्यांच्या अत्यंत प्रशंसित, धाडसी पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय यांच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, प्रेक्षक आणि चाहत्यांकडून हा चित्रपट ‘मस्ट वॉच’ म्हणून गौरवला जात आहे.

मर्दानी 3 चा ट्रेलर देशभरातून तरुण मुलींच्या अपहरणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आधारित असल्याने तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. देशाच्या विविध भागांतून अनेक तरुण मुली बेपत्ता होत असल्याच्या अलीकडच्या घटनांचे प्रतिबिंब या चित्रपटात दिसून येत असून, त्यामुळे प्रेक्षक आणि सिनेप्रेमी भावनिकरीत्या जोडले गेले आहेत.

चित्रपटाला सर्वच स्तरांतून भरभरून प्रतिसाद मिळत असून, मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी अहमदाबादला भेट दिल्यावर राणी मुखर्जी यांनी हे प्रेम प्रत्यक्ष अनुभवले.

अहमदाबादमधील चाहत्यांशी संवाद साधताना राणी म्हणाल्या, “मकर संक्रांतीच्या निमित्ताने गुजरातमध्ये, अहमदाबादमध्ये येऊन मला खूप आनंद होत आहे. हा अत्यंत शुभ दिवस आहे आणि इथे मर्दानीला मिळणारे प्रेम पाहून मी खूप आनंदी आहे. मला आणि माझ्या चित्रपटाला इतके प्रेम दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. धन्यवाद.”

अहमदाबाद दौऱ्यादरम्यान राणी मुखर्जी यांनी एका मुलींच्या महाविद्यालयाला भेट देत भारतातील महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर संवाद साधला. याशिवाय अहमदाबादमध्ये आयोजित प्रतिष्ठित इंटरनॅशनल काईट फेस्टिव्हलमध्ये त्यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला आणि राज्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत समाजासाठी त्यांच्या अमूल्य सेवेबद्दल आभार मानले.

मर्दानी 3 हा चित्रपट 30 जानेवारी रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या