Maharashtra Election : राज्य निवडणूक आयोगाने लोकशाही प्रक्रियेची शुचिता राखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियावरील प्रचारासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचार करण्याबाबत महत्त्वाचे नियम
-प्रसारणापूर्वी प्रमाणपत्र आवश्यक
-कोणतेही प्रचार साहित्य (जाहिरात, व्हिडिओ, ऑडिओ, रील्स, जिंगल्स इ.)
– महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा राज्यस्तरीय समितीकडून तपासून ‘प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक आहे.
या समितीमध्ये अध्यक्ष व सदस्य निश्चित करण्यात आले आहेत तेच संबंधित प्रचार सामग्री तपासून मान्यता देतात.
प्रचारबंदी कालावधीत पूर्णपणे मनाई
प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि प्रिंट मिडिया दोन्ही माध्यमांवरील प्रचार थांबवणे आवश्यक.यात खालील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचाही समावेश आहे.
X (Twitter)
YouTube
इतर मेसेजिंग ॲप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स
गैरवापर झाल्यास कठोर कारवाई
जर उमेदवार, पक्ष किंवा कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह पोस्ट्स, दिशाभूल करणारे संदेश, द्वेष पसरविणारे कंटेंट किंवा खोटी माहिती प्रसिद्ध केली तर त्यांच्यावर सायबर गुन्हे कायदा, २०१५ आणि संबंधित निवडणूक कायद्यांनुसार कडक कारवाई होईल.



