6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Deepak Chahar : IPL 2026 साठी मुंबई इंडियन्स चा ‘मास्टर प्लॅन’; ‘या’ स्टार खेळाडूला करणार रिटेन

Deepak Chahar : बीसीसीआयकडून आणि सर्व संघांकडून आयपीएल 2026 साठी जोरदार तयारी पहायला मिळत आहे. उद्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करण्याचा शेवटचा दिवस आहे. यातच मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) एक मोठा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएल (IPL 2026) हंगामासाठी स्टार ऑलराउंडर दीपक चहरला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दीपक चहर (Deepak Chahar) पुन्हा एकदा सीएसकेकडून खेळणार असं सांगण्यात येत होते मात्र आता तो मुंबईकडून खेळणार हे स्पष्ट झाले आहे.

गेल्या हंगामात तो 9.28 कोटी रुपयांना मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला होता.

मुंबई दीपक चहरला कायम ठेवणार

आयपीएल 2025 मध्ये दीपक चहरची कामगिरी प्रभावी नव्हती. त्याने 14 सामन्यांमध्ये फक्त 11 विकेट्स घेतल्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट 9.17 होता. या कामगिरीनंतरही, शार्दुल ठाकूरच्या संघात आगमनामुळे दीपक चहरला प्राधान्य दिले जाईल का हे पाहणे बाकी आहे.

शार्दुल ठाकूर मुंबई इंडियन्समध्ये सामील

तर दुसरीकडे शार्दुल ठाकूर देखील मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. मुंबईने त्याला ट्रेडकडून संघात सामील केले आहे. गेल्या हंगामात, लखनौ सुपर जायंट्सने शार्दुलला जखमी खेळाडूच्या जागी 2 कोटींना करारबद्ध केले. त्याने त्या हंगामात 10 सामने खेळले आणि संघासाठी उपयुक्त कामगिरी केली. आता, आयपीएल 2026 च्या हंगामापूर्वी, त्याला त्याच रकमेत मुंबई इंडियन्समध्ये खरेदी करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या