Maharashtra Election : 2019 पासूनच्या सर्व निवडणुकात मी एकूण उमेदवारात घराणेशाहीचे उमेदवार किती असा अभ्यास करतो आहे. 2024 लोकसभा अभ्यास मांडला होता व विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीचे उमेदवार 288 पैकी 238 होते व 61 मतदारसंघात एकापेक्षा जास्त घराणेशाही उमेदवार होते.नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अभ्यास केला असता एकूण 70 उमेदवार हे घराणेशाहीचे होते असा आरोप हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.
एकूण उमेदवारांच्या जवळपास 67 टक्के उमेदवार महायुतीचे आहेत आणि त्यातही एकूण उमेदवारांत भाजपचे 42 टक्के उमेदवार आहे. त्यामुळे घराणेशाही असलेला सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे.
पूर्वी घराणेशाही म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी असे समीकरण होते पण त्यातील बहुसंख्य नेते हे भाजपमध्ये गेल्याने आज भाजप हा घराणेशाही असलेला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकूण उमेदवारात 42 टक्के उमेदवार आज भाजपाचे आहेत.
एकूण घराणेशाही उमेदवार 70
त्यातील भाजप 30
शिंदेंसेना 14
अजितदादा 3
महायुती एकूण 47 (67 टक्के)
महाविकास आघाडी तिघे मिळून 12 ( एकूण 17 टक्के)
घराणेशाहीचे विजयी उमेदवार
नंदुरबार : रत्ना रघुवंशी(शिंदे सेना) आमदार रघुवंशी यांच्या पत्नी
दोंडाईचा : नयनकुंवर रावल(भाजप) मंत्री रावल यांची आई
शिरपूर : चिंतन पटेल(भाजप) माजी मंत्री अमरीश पटेल यांचा मुलगा व भाऊ
बुलढाणा : पूजा गायकवाड( शिंदेसेना) आमदार संजय गायकवाड यांची पत्नी
खामगाव : अपर्णा फुंडकर(भाजप) मंत्री आकाश फुंडकर यांची भावजयी
यवतमाळ : प्रियदर्शिनी उईके (भाजप) मंत्री अशोक उईके यांची मुलगी
पुसद : मोहिनी नाईक (राष्ट्रवादी अजित पवार) मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी
चंद्रपूर : अरुण धोटे(काँग्रेस) माजी आमदार सुभाष धोटे यांचे बंधू
धामणगाव रेल्वे अर्चना रोठे ( भाजप) : आमदार प्रताप अडसर यांच्या भगिनी
चिखलदरा : अल्हाद कलोती(भाजप) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ
साकोली देवश्री कापगते (भाजप) माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांची सून
दुधनी: प्रथमेश म्हेत्रे (शिंदे सेना )माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचे पुतणे
पंढरपूर : प्रणिती भालके (स्थानिक आघाडी) आमदार भगीरथ भालके यांची पत्नी
अनगर : प्राजक्ता पाटील (भाजप ) माजी आमदार राजन पाटील यांची सून
अक्कलकोट : मिलन कल्याणशेट्टी(भाजप) आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा भाऊ
जामनेर : साधना महाजन(भाजप) मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी
चाळीसगाव : प्रतिभा चव्हाण (भाजप) आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी
पाचोरा: सुनिता पाटील (शिंदेसेना) आमदार किशोर पाटील यांची पत्नी
मुक्ताईनगर : संजना पाटील( ठाकरे सेना) आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी
समीर सत्तार : (शिंदे सेना ) अब्दुल सत्तार यांचा मुलगा
संगमनेर : मैथिली तांबे (आघाडी) येथे आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी
मुरगूड : सुहासिनी परदेशी (शिंदे सेना) येथे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांची पत्नी
जयसिंगपूर : संजय पाटील (आघाडी) आमदार राजेंद्र पाटील यड्रवकर यांचा भाऊ
आष्टा : विशाल शिंदे(राष्ट्रवादी शरद पवार) माजी आमदार विलासराव शिंदे यांचा मुलगा
कागल : सेहरनिदा मुश्रीफ( अजित पवार राष्ट्रवादी) मंत्री हसन मुश्रीफ यांची सून
कुरुंदवाड : मनिषा डांगे(आघाडी) माजी नगराध्यक्ष कुटुंबातील
देवळाली : सत्यजित कदम (भाजप) चंद्रशेखर कदम यांचा मुलगा
श्रीरामपूर : करन ससाणे(कॉंग्रेस) माजी आमदार ससाणे यांचा मुलगा
राहाता : स्वाधीन गाडेकर (भाजप) वडील नगराध्यक्ष राहिलेले
पाथर्डी : अभय आव्हाड (भाजप )वडील बाबूजी आव्हाड माजी आमदार
गंगाखेड : उर्मिला केंद्रे (अजित पवार) माजी मंत्री धनंजय मुंडे यांची बहीण
अंबेजोगाई : नंदकिशोर मुंदडा( आघाडी) आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे
हिंगोली : रेखा बांगर (शिंदे सेना) आमदार बांगर यांची वहिनी



