6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; भुजबळांना वगळलं

Chhagan Bhujbal : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात सुरुवातील नगरपंचायत आणि नगरपरिषदांसाठी निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी आता राजकीय पक्षाकडून उमेदवार निवडीचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच प्रचारात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी काम केलं जात आहे.

यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकांसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केलेल्या 40 स्टार प्रचारकांची यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांचं नाव नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांचा नाव या यादीत नसल्याचे बोलले जात आहे.

छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाल्याने पक्षाचा नुकसान होत असल्याने अजित पवार भुजबळांवर नाराज आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस 40 स्टार प्रचारकांची यादी

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रताप पाटील – चिखलीकर, माजी मंत्री नवाब मलिक, नेते सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक – शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, नजीब मुल्ला, प्रतिभा शिंदे आणि विकास पासलकर

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या