6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शहराध्यक्षाला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Sharad Pawar: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची कामगिरी चांगली नसल्याने आता या निवडणुकीत पक्ष कशी कामगिरी करणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

तर दुसरीकडे एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शहराध्यक्षाला बेदम मारहाण करण्यात आली.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाला मारहाण झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Group) शहराध्यक्षाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शहराध्यक्ष नितीन तावरे (Nitin Tavre) यांना मारहाण झाली आहे.

ही मारहाण का झाली याद्या पर्यंत समजू शकलो नसलं तरी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सविस्तर माहिती देऊ अशी पोलिसांनी (Police) माहिती दिलेली आहे.

मारहाणीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. राजकारणातून ही मारहाण झाली असल्याची जास्त शक्यता वर्तवली जातेय.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या