Santosh Tarfe : विधानपरिषदेचे माजी आमदार प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेस पक्षाची साथ सोडली असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता हिंगोली जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, कळमनुरी मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत काँग्रेसमध्ये घर वापसी करू शकतात.
माजी आमदार संतोष टारफे यांना पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यातही काही काँग्रेसमधील बडे नेते प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
संतोष टारफे यांनी माजी खासदार कै. राजीव सातव निधनानंतर बदलत्या राजकीय घडामोडीमुळे काँग्रेस सोडून त्यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता.
प्रज्ञा सातव यांनी पक्षातंर केल्यानंतर अधिच कमकुवत झालेल्या काँग्रेसला मतदारसंघात व जिल्ह्यात मोठा राजकीय झटका बसला आहे यातून पक्षाला सावरण्यासाठी व पक्षाला शहरी ग्रामीण भागात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी डॉ. संतोष टारफे काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात.
मोठ्या घडामोडी घडू शकतात
अगामी काही दिवसात कळमनुरी मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात अस राजकीय हालचाली, गाठीभेटी यातून दिसून येत आहे. डॉ. टारफे यांनी जर खरच घरवापसी केली तर अगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आधी कॉग्रेसला मोठा जनाधार मिळू शकतो. याबाबत माजी आ.डॉ. संतोष टारफे समर्थकही त्यांच्या भुमिकेकडे लक्ष लाऊन आहे.



