6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Pune Accident News: नवले ब्रिजनंतर पुण्यात पुन्हा अपघात; सात ते आठ वाहन धडकली

Pune Accident News : पुण्यातील नवले ब्रिजवरील अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा शहरातील येरवडा परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. गोल्फ क्लब उड्डाणपुलाजवळ सलग ७ ते ८ वाहनांची एकमेकांना टक्कर झाल्याने परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. यांनतर अपघातस्थळी पोलीस पोचले आणि येथील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलावर गर्दीच्या वेळी अचानक वेगाने चालणाऱ्या वाहनांनी नियंत्रण सुटल्याने एकामागोमाग ७ ते ८ गाड्या एकमेकांवर धडकल्या. धडक जोरात बसल्याने वाहनांचे पुढील भाग पूर्णपणे फुटले आहेत. यामध्ये अपघात झालेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

या अपघातात सुमारे १० ते १२ जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर उड्डाणपुलावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, येरवडा पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने अपघात झालेल्या वाहनांना बाजूला घेण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काही वाहनांनी एकमेकांवर अशी धडक मारली की काही कार अक्षरशः एकमेकांमध्ये घुसल्या. या अपघातामागचं नेमकं कारण काय, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, येरवडा पोलिसांकडून या संदर्भात तपास सुरू आहे.

सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे पुणेकर त्रस्त झाले असून यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या