6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Kanya Vidya Mandir School : कन्या विद्या मंदिर प्रशालेच्या माजी विद्यार्थिनींचा माहेरमेळावा जल्लोषात संपन्न

Kanya Vidya Mandir School : अहिल्यानगर येथील नव विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी ग.ज. चितांबर विद्या मंदिर (जुने नाव – कन्या विद्या मंदिर) या विद्यालयाचा दोन दिवस चाललेला माजी विद्यार्थिनींचा “माहेरमेळावा” अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. “माजी विद्यार्थिनी संघ” आणि नव विद्या प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात 1965 पासून ते 2022 पर्यंतच्या साडेसातशेहून अधिक माजी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

मेळाव्याचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, मानद सचिव निलेश वैकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विभावरी रोकडे, पर्यवेक्षिका मंदा शिंदे आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कन्या विद्या मंदिरच्या सुवर्ण परंपरेचा गौरव केला. तसेच माजी विद्यार्थिनींच्या जीवनप्रवासातील यशोगाथांचा उल्लेख करून विद्यालयाच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला.

मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरला तो म्हणजे “हृदयस्पर्शी गुरुपूजन सोहळा”.  शाळेतील आजी-माजी शिक्षकांचे विद्यार्थिनींनी पारंपरिक पद्धतीने पूजन करून त्यांच्या ऋणाची आठवण कृतज्ञतेने व्यक्त केली. या प्रसंगी वातावरण शिक्षक-विद्यार्थिनींच्या भावनांनी भारावून गेले.

या दोन दिवसांच्या मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम, संवाद सत्र, बालपणीच्या आठवणींची उजळणी, तसेच शाळेच्या प्रगतीविषयीच्या योजना या सर्वांचा समावेश होता.

मेळावा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थिनी संघाच्या रेश्मा आठरे, अर्चना पलूसकर, अपर्णा क्षीरसागर, स्नेहा जोशी, रोहिणी वाघमारे, प्रिया बापट, दर्शना गांधी, सारिका कटारिया, मीनाक्षी पाठक,अमृता पाथरकर, प्रज्ञा जोशी आदींनी परिश्रम घेतले.

अनेकांनी आपले बालपण पुन्हा अनुभवत “कन्या विद्या मंदिर म्हणजे आमचे माहेरच” असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचा समारोप प्रसिद्ध निवेदक चेतन गायकवाड यांच्या विनोदी सादरीकरणाने उत्साहात संपन्न झाला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या