Rupali Thombare : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली ठोबरेंवर (Rupali Thombare) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) मोठी कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने मोठा निर्णय घेत रूपाली ठोबरे यांची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी केली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील रूपाली ठोबरे यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले होते. तर आज पक्षाने त्यांची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी केली आहे.
रूपाली ठोबरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची देखील प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रूपाली ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करत अनेक गंभीर आरोप केले होते.त्यामुळे पक्षाने त्यांना करणे दाखवा नोटीस बजावली होती आणि सात दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. यानंतर रूपाली ठोबरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती मात्र या भेटीच्या काही तासानंतरच पक्षाकडून रूपाली ठोबरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
प्रकरण काय?
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी तरुणीचं चारित्र्यहनन केलं असा आरोप करत रूपाली ठोबरे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. यानंतर रूपाली चाकणकर यांनी देखील प्रतिक्रिया देत रूपाली ठोबरे यांच्यावर टीका केली होती तर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून रूपाली ठोबरे यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने आता या प्रकरणात रूपाली ठोबरे काय? प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ते लिस्ट
अनिल पाटील
अविनाश आदिक
सना मलिक
रुपाली चाकणकर
ब्रिजमोहन श्रीवास्तव
चेतन तुपे
आनंद परांजपे
राजलक्ष्मी भोसले
सुरज चव्हाण
हेमलता पाटील
सायली दळवी
शशिकांत तरंगे
प्रतिभा शिंदे
विकास पासलकर
राजीव साबळे
प्रशांत पवार
श्याम सनेर



