Shankarrao Gadakh : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 2 डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी मतदान होणार आहे तर 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नेतेमंडळी देखील आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे.
यातच अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात एक मोठी राजकीय घटना घडली आहे. ज्यामुळे राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले. राज्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी मोठा निर्णय घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का मानला जात आहे.
माजी मंत्री शंकरावर गडाख यांनी 2017 मध्ये अपक्ष असताना क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत त्यांचे सर्वाधिक नगरसेवक जिंकून आले होते.
माजी मंत्री शंकरावर गडाख यांनी 2019 विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढणार बाजी मारली होती. यानंतर शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. तेव्हा त्यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागली होती. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तर त्यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेत आता राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेतला आहे.



