Sheetal Tejwani : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून अटकेत असलेल्या शीतल तेजवानीबद्दल दररोज नवीन नवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहे. पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानी यांची चौकशी सुरू असून या चौकशीत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
शीतल तेजवानीने रणबीर कपूरविरुद्ध तब्बल 50 लाखांच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल केल्याची समोर आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील ट्रॅम्प टॉवरमधील एका भाडेकराराशी निगडित वादात शीतल तेजवानीने रणबीर कपूरविरुद्ध तब्बल 50 लाखांच्या नुकसानभरपाईचा दावा केला आहे. या प्रकरणात 5 जानेवारी 2026 रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
रणबीर कपूरने संबंधित फ्लॅटच्या करारातील निकषांचे पालन न करता ‘लॉक-इन’ कालावधी पूर्ण न केल्यामुळे आर्थिक तोटा झाला, असल्याचा दावा शीतल तेजवानीने केला आहे.
तर दुसरीकडे मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी आणि सूर्यकांत येवले यांच्यावर आर्थिक गुन्ह्यांचे आरोप असून तपास वेगाने चालू आहे. अधिकारी रवींद्र तारू यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील आक्रमक भूमिका घेत दररोज नवीन नवीन खुलासे करत आहे.



