4.8 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img
spot_img

Shivendra Raje Bhosale: “मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे!”; शिवेंद्रराजेंचा साताऱ्यात रणसिंघ

Shivendra Raje Bhosale : साताऱ्यातील करहरमध्ये शिवेंद्रराजेंनी जोरदार हल्लाबोलकरत ‘पुनर्रचना देवाभाऊच करणार, गैरसमज ठेवू नका’ असा ठणकावून इशारा विरोधकांना इशारा दिला.

यावेळी शिवेंद्रराजे म्हणाले की, “मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे. वेळ आली तर कोणालाच सोडणार नाही!”असे ज्वालाग्राही शब्द उच्चारत सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्याच्या करहर येथील प्रचारसभेत शिवेंद्रराजे भोसले अक्षरशः बरसले. त्यांच्या या आक्रमक आणि स्पष्ट इशाऱ्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला. विरोधकांकडून सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांना थेट उत्तर देत शिवेंद्रराजेंनी रणसिंघ फुंकला.

सन 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जावळी तालुक्याची विधानसभा निहाय पुनर्रचना होणार, आणि त्यातून आपल्याला पुन्हा संधी मिळणारअशी दिवास्वप्नं काही नेत्यांना पडू लागली आहेत, असा टोला लगावत शिवेंद्रराजे म्हणाले, “मी स्पष्ट सांगतो ही सगळी पुनर्रचना महाराष्ट्राचा बॉस देवेंद्र फडणवीसच करणार. देवाभाऊ माझा नेता आहे.

त्यामुळे कोणीही गैरसमज पाळू नका.” या शब्दांतून त्यांनी नेतृत्वावरील निष्ठा आणि राजकीय दिशा ठामपणे मांडली.

राज्यात उद्या 7 फेब्रुवारी रोजी 12 जिल्हा परिषद आणि  पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून 9 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या