Uday Samant on Uddhav Thackeray : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत युती करणार असल्याचे संकेत मिळाले आहे. या युतीमुळे मुंबई महानगर पालिकेमध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधू सरकार स्थापन करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाली तरीही मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता येणार असा दावा राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, मनसे आणि शिवसेनेची UBT युती होणार अशी चर्चा आहे. त्यांची युती झाली किंवा अजून कोणाची आघाडी जरी झाली तरी मुंबई महापालिकेवरती महायुतीची सत्ता येणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईतील विकासाचे केलेली कामे जनता विसरणार नाही असेही यावेळी उदय सामंत म्हणाले.
उद्धव ठाकरे सहा नंबरच्या लाईनमध्ये बसले होते
कालचा फोटो एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचा पाहिला तर अमित शहा यांच्या खुर्चीला खुर्ची लावून एकनाथ शिंदे बसले होते. दिल्लीमध्ये व्होट चोरीच्या पिक्चर दाखवला त्यावेळी उद्धव ठाकरे सहा नंबरच्या लाईनमध्ये बसले होते.
एकनाथ शिंदे एनडीए मधील प्रमुख नेते आहेत.काही लोकांना दुर्दैवानं सहा नंबरच्या लाईनमध्ये राहून वोट चोरीचा पिक्चर पाहावा लागतो अशी टिका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
तर दुसरीकडे यावेळी त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करत मी महाराष्ट्रमध्ये फिरतो आणि एकनाथ शिंदेंचा सहकारी म्हणून फिरतो असं म्हटलं आहे. उदय सामंत म्हणाले की, जगातला आजचा सर्वात मोठा हा विनोद आहे जो आज सुषमा अंधारे यांनी केला आहे
मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. एकनाथ शिंदे यांच्यामुळे काही लोकांच्या पोटामध्ये पोटसुळी आहे मी महाराष्ट्रमध्ये फिरतो आणि एकनाथ शिंदेंचा सहकारी म्हणून फिरतो. अंधारे ताईंनी केलेला जो विनोद आहे त्याला मी दात देतो. माझा नाव घेऊन त्यांना टीआरपी मिळत असेल तर यात माझा काय दोष. सुषमा अंधारे माझ्या बहिणीसारखे आहेत एखाद्याचा पॉलिटिकल करिअर बरबाद करणं ज्या काही गोष्टी होतात त्यांनी त्या करू नये.



