Bank FD : नवीन वर्ष सुरू झाले असून तुम्ही देखील या वर्षी बँक एफडी करण्याचा विचार करत असाल, तर देशातील पाच मोठ्या बँकांमधील 5 वर्षांच्या एफडीवरील व्याजदरांची संपूर्ण माहिती देणार आहोत. तुम्ही आयकर कलम 80सी अंतर्गत पाच वर्षांच्या एफडीवरील कर सवलतीसाठी पात्र देखील होऊ शकता. जुन्या कर प्रणालीनुसार, तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करून 1.50 लाख रुपयांपर्यंत कर कपात करू शकता.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे 5 वर्षांचे एफडी दर:
सामान्य ग्राहक: 6.05% प्रतिवर्ष
ज्येष्ठ नागरिक: 7.05% प्रतिवर्ष
पंजाब नॅशनल बँक (PNB) चे 5 वर्षांचे एफडी दर:
सामान्य ग्राहक: 6.00% प्रतिवर्ष
ज्येष्ठ नागरिक: 6.80% प्रतिवर्ष
बँक ऑफ बडोदाचे 5 वर्षांचे एफडी दर:
सामान्य ग्राहक: 6.00% प्रतिवर्ष
ज्येष्ठ नागरिक: 7.00% प्रतिवर्ष
एचडीएफसी बँकचे 5 वर्षांचे एफडी दर:
सामान्य ग्राहक: 6.15% प्रतिवर्ष
ज्येष्ठ नागरिक: 6.65% प्रतिवर्ष
आयसीआयसीआय बँकचे 5 वर्षांचे एफडी दर:
सामान्य ग्राहक: 6.60% प्रतिवर्ष
ज्येष्ठ नागरिक: 7.10% प्रतिवर्ष
एफडी करताना या गोष्टी लक्षात ठेवा
बहुतेक बँका त्यांच्या गुंतवणूकदारांना एफडी गुंतवणूक पर्याय देतात. पण तुमच्यासाठी सर्वोत्तम एफडी कोणती हे तुम्हाला कसे कळेल? तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांशी जुळणाऱ्या कालावधीच्या एफडीमध्ये गुंतवणूक करावी. तुमच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर अवलंबून, तुम्ही योग्य एफडी कालावधी निवडू शकता.
तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वोत्तम व्याजदर देणारे एफडी तुम्ही निवडावेत. जेव्हा एफडी व्याजदर वाढण्याची अपेक्षा असते, तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या परिपक्वता असलेल्या अनेक एफडीमध्ये गुंतवणूक करून एफडीची शिडी तयार करू शकता आणि दीर्घकालीन एफडी व्याजदराची सरासरी काढू शकता.



