17.8 C
New York
Friday, August 21, 2026

Buy now

spot_img
spot_img

तुकाराम मुंढे यांच्या कार्यावर आधारित अमोल निर्मळ यांचे आकर्षक फलक लेखन

राहाता (अहिल्यानगर अपडेट 24):-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, पिंपरी निर्मळ येथील विद्यालयाचे कलाध्यापक अमोल निर्मळ यांनी आपल्या कलाकौशल्यातून अभिनव व प्रेरणादायी सद्यस्थिती बद्दल फलक लेखन साकारले.

१५ ऑगस्ट २०२६ या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनहिताच्या कार्यावर आधारित हा विद्यालयाचे शिक्षक निर्मळ यांनी फलक तयार करून “सुरक्षित अन्न आणि प्रभावी औषध – निरोगी भारताची होय सुरुवात”, तसेच “सुरक्षित अन्न, निरोगी जनता, प्रभावी औषध आमचा संकल्प” अशा प्रभावी संदेशांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न या फलक रेखाटनातून केला आहे.

फलकावर तिरंगा, स्वातंत्र्याचे प्रतीक असलेले कबूतर, उत्साही युवक-युवतींची आकर्षक आकृती, सुरक्षित अन्न व औषधांचे प्रतीक तसेच तुकाराम मुंढे यांचे सुंदर रेखाचित्र साकारण्यात आले आहे. “स्वातंत्र्याचा अभिमान, जबाबदारीची जाणिव” हा संदेशही फलकाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

संपूर्ण फलकाची रचना रंगीत खडूंच्या साहाय्याने करण्यात आली असून त्यामध्ये कलात्मकता, देशभक्ती आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख संगम साधण्यात आला आहे.अमोल निर्मळ यांनी याआधीही सामाजिक विषय घेऊन फलक लेखनातून जनजागृती केली आहे.या आगळ्यावेगळ्या फलक लेखनाचे अनेक स्थरातून कौतुक होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या