4.9 C
New York
Monday, April 20, 2026

Buy now

spot_img
spot_img

Vijay Wadettiwar: भाजपने मुस्लिम लीगसोबत युती केली तर बरोबर अन् आम्ही केली तर … विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

Vijay Wadettiwar: चंद्रपुरात सत्ता काँग्रेस स्थापन करणार असल्याचा दावा करत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचा महापौर होणार ते कसे होईल हे येणारा काळ सांगेल असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.

माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, चंद्रपुरात सत्ता काँग्रेस स्थापन करणार आहे. काँग्रेसचा महापौर होणार ते कसे होईल हे येणारा काळ सांगेल.

कोण कोणाला भेटले ते आम्हालाही भेटून गेले. भाजपने मुस्लिम लीग सोबत युती केली तर बरोबर आम्ही केली तर चालत नाही. अचलपूरमध्ये भाजपने सत्तेसाठी युती केली आम्ही स्वीकृत नगरसेवक पदासाठी केली तर त्यात चूक काय? असं माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले.

तर मुंबई महापालिकेत सत्ता कोणाची येणार यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, आता जुळवाजुळव सुरू आहे, वाद आहे. सत्ताधाऱ्यांमध्यें वाद आहे. अजूनही तिथे एकमत नाही. आपसांत बेबनाव आहे. आपसांत पदावरून मारामाऱ्या आहेत हे आता सिद्ध झाले आहे.

तर दुसरीकडे यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर देखील निशाणा साधला. विजय वडेट्टीवार म्हणाले की,

मुनगंटीवार यांचे स्वप्न कुठे आहे हे माहीत नाही. सुधीर भाऊंच्या बानामध्ये आता तीर नाही. आमचे नगरसेवक कुठेही जाणार नाही. माझ्याकडे 20 नगरसेवक आहेत.

गिरीश महाजन वादावर प्रतिक्रिया

यांचा बाबासाहेबांना विरोध आहे, संविधान निर्माण करताना त्याला विरोध करणारी ही मंडळी आहे. आंबेडकरांचे नाव घ्यायला लाजच वाटते, या देशात राहण्याचा अधिकार आहे, जे संविधानाला मनात नाही ते खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहेत का? संविधान निर्मात्याचे नाव घ्यायला लाज वाटते तर हे हुकूमशाही की लोकशाही पद्धतीने सत्तेवर आले याचे उत्तर सरकार मागेल असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या